पवनमावळातील शेती 
नामशेष होण्याच्या मार्गावर

पवनमावळातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर

सोमाटणे, ता. ५ ः जमीन विक्रीमुळे पवनमावळातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आली असून शेतीची कामे सोडून गावठी कट्टे घेऊन फिरणारे तरुण वाढले आहेत.
पवनमावळ पूर्व भागातून बारमाही वाहणाऱ्या पवना, कासारसाई, आढले या नद्या उंच व जंगलांनी वेढलेल्या पर्वत रांगा दळणवळणाच्या चांगल्या सोयी येथे सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे गेल्या एक दशकापासून शहरी भागातील धनिकांचा ओढा पवनमावळ पूर्व भागातील जमिनी घेण्यासाठी वाढला आहे. याचाच परिणाम मावळात जमिनी विक्रीचा व्यवसाय वाढला असून मिळेल त्या किमतीला जमिनी घेण्यासाठी सपाटा शहरी भागातील धनिकांनी सुरू केला. यातूनच गुंठेवारी वाढली असून अनेक पिढ्यांपासून शेतीप्रधान गाव असलेले सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, सांगवडे, साळुंब्रे, चांदखेड, पाचाणे, पुसाणे, कासारसाई, आढले, बेबडओहोळ, परंदवडी येथे सिमेंटचे जंगल उभे राहिले. सध्या चांगले पीक येणाऱ्या सुपीक जमिनी ओसाड पडल्या असून त्या तारेच्या कुंपणात बंदीस्त होऊन त्याचे रूपांतर गुंठेवारीत झाले आहे. वाढत्या जमिनी विक्रीच्या व्यवसायामुळे सध्या तरुणांकडे पैसा वाढला असून दररोज सकाळी शेतीची औजारे घेऊन शेतात कामाला जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या मुलांचा कल गावठे, देशी अधिकृत व अनधिकृत कट्टे मिळविण्याकडे वाढला आहे.
पोलिसातील नोंदीनुसार गेल्यावर्षी आढले येथे गावठी कट्याचा वापर झाला. यावर्षी चांदखेड येथे यात्रेत दहशत माजविण्यासाठी हवेत गोळीबार तर शिरगाव येथे गावठी कट्टा बाळगणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सध्या पवनमावळ पूर्व भागात शेती विक्री वाढल्याने शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आली असून पैशाची आवक वाढल्याने तरुणांचा ओढा शस्त्र मिळविण्याकडे वाढू लागला आहे.

PNE23T22824
Smt५Sf१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com