हप्ता मागत धमकी देणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा

हप्ता मागत धमकी देणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा

केसमध्ये अडकविण्याची
धमकी; दोघांवर गुन्हा

पिंपरी : ‘हा माझा चौक आहे, येथे गाड्या लावून व्यवसाय करायचा असेल तर दररोज हप्ता द्यायचा, नाहीतर माझी मुलगी वकील आहे, खोट्या केसमध्ये अडकवेन,’ अशी धमकी देणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बाणेर येथे घडला.
तुषार मल्हारी कोकरे (रा. राजमाता जिजाऊनगर, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विठ्ठल वाडकर (वय ५८), व एक महिला (वय ५२, दोघेही रा. बाणेर रोड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा बाणेरमधील बिट वाईस कंपनीसमोर भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्यासह नारळविक्रेता विशाल व भाजीविक्रेता प्रमोद धनावडे हे देखील येथे व्यवसाय करीत असताना महिला आरोपी तेथे आली. ही जागा आमच्या मालकीची असून तुम्हाला येथे गाड्या लावायच्या असतील तर दरदिवशी तीनशे रुपये तसेच पाचशे रुपये हप्ते द्यावे लागतील. असे म्हणत फिर्यादीकडून रोख व ऑनलाईनद्वारे पैसे मागून घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com