प्रमुख तीन उमेदवारांच्या प्रतिक्रीया

प्रमुख तीन उमेदवारांच्या प्रतिक्रीया

१) दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघात केलेल्या विकासाला मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये पहिल्यापासून प्रचंड उत्साह होता. त्यांचा हा उत्साह भाजपला बळ देणारा आहे. ज्यादिवशी भाजपने मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, त्याचदिवशी माझा विजय निश्चित झाला होता.
- अश्विनी लक्ष्मण जगताप, भाजप व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार.

२) माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती. ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पराभवाच्या भीतीने, पैसा व पोलिस यंत्रणेचा गैरवापर करणे, कार्यकर्त्यांना धमकावणे असेही प्रकार झाले. मात्र, त्याचा कुठेही परिणाम होऊ न देता कार्यकर्ते त्वेषाने लढले. मतदारांच्या चेहऱ्यावर दिसणार हास्यच मला विजयाची खात्री देत होते.
- विठ्ठल ऊर्फ नाना काटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार.

३) कार्यकर्ते व जनतेचे मला मिळालेले पाठबळ व बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मला दिलेला पाठिंबा यामुळे मी ही निवडणूक लढलो. या निवडणुकीमुळे चिंचवड मतदारसंघातील जनतेची अस्मिता व स्वाभिमान जागा झाला. कार्यकर्त्यांच्या बळावर व जनतेच्या आशीर्वादाने या पोटनिवडणुकीत माझा विजय निश्चित आहे.
- राहुल कलाटे, बहुजन वंचित आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com