नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेत
४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

पिंपरी, ता. ३ ः माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महापालिकेने धुलीवंदन व होळीनिमित्त नैसर्गिक रंग निर्मिती ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात विविध शाळेतील ४० हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.
कार्यशाळेचे उद्‍घाटन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. उपआयुक्त रविकिरण घोडके, माध्यमिक शिक्षण विभागाचे उपआयुक्त संदीप खोत, स्वच्छ भारत समन्वयक तथा सहायक आयुक्त सोनम देशमुख, पर्यावरण संरक्षक गतिविधी ओंकार नाझरकर, सुधीर माऊलकर उपस्थित होते. वाघ म्हणाले, ‘‘आधुनिक जगात वावरताना अनेक पारंपारिक गोष्टींचा विसर पडत आहे. रासायनिक रंग निर्मिती हा त्यातीलच एक प्रकार आहे. पुढील पिढीला नैसर्गिक व पर्यावरण रंगांची ओळख करून देणे आपले कर्तव्य आहे. यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे.’’
नैसर्गिक रंग निर्मिती प्रशिक्षक प्रिया फुलंब्रीकर यांनी मार्गदर्शन केले. अनेक वेगवेगळ्या फुलांपासून रंग कसे बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी प्रास्ताविक केले. ‘अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा’ या काव्यातून त्यांनी निसर्गाचे महत्त्व सांगितले.

रासायनिक रंग का नको
- शरीर, त्वचा, डोळा यांना इजा होते
- रसायनांमुळे निसर्गाला हानी पोहचते
- कपडे व अंगावर रंगाचे डाग पडतात

असा बनवा नैसर्गिक रंग
- द्राक्षांच्या सालीपासून हिरवा रंग बनतो
- कांद्याच्या पातीपासून फिकट गुलाबी रंग बनतो
- जास्वंदीचे फुल लाल असूनही काळा रंग बनतो

नैसर्गिक रंगाचे फायदे
- द्राक्ष व कांदा पातीच्या पाण्यात औषधी गुणधर्म
- जास्वंदीचे फुलाच्या रंगात लोहाचे प्रमाण अधिक
- रसायनांमुळे शरीर व निसर्गाची हानी टळते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com