कोथिंबीर जुडी अवघी पाच रुपयांना

कोथिंबीर जुडी अवघी पाच रुपयांना

पिंपरी, ता. ५ : पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत कोथिंबिरीच्या जुड्यांची आवक १७०० जुड्या झाली असून पाच रुपये भाव रविवारी (ता. ५) कोथिंबिरीला मिळाला आहे. त्याम६ुळे पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीचा पुरवठा सर्वाधिक आहे. आवक जास्त झाल्याने मागणी घसरली आहे. परंतु, भाजीपाल्याला हवा तसा भाव मिळत नसल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सध्या मंडईत सर्वाधिक भाव हा हिरव्यागार भेंडीला आहे. सध्या भेंडी ४५ रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू आहे. तर, वांग्यालाही १० ते १५ रुपयांपर्यंत भाव आहे. त्यामुळे, भेंडीची आवक कमी झाल्याने मागणी अधिक वाढली आहे. तर, नेहमीप्रमाणे कांदा व टोमॅटोचे भाव आणखी कोसळले आहेत.

फळभाज्यांचे भाव किलोमध्ये ः कांदा : ८ ते १०, भेंडी : ४५, टोमॅटो : ११ ते १२, घेवडा : ४५, फ्लॉवर : ८ ते १०, कोबी : ५ ते ६, वांगी : १० ते १५, बीट : १२, घोसाळी : ३०.

पालेभाज्या जुड्यांचे भाव ः कोथिंबीर : ५ ते ६, मेथी : ६ ते ७, शेपू : ६ ते ७, पालक : ५ ते ७, चवळी : ६ ते ७

आवक क्विंटलमध्ये ः कांदा : ६६, भेंडी : १ , टोमॅटो : ११ , घेवडा : ४ , फ्लॉवर : १३, कोबी : ५, वांगी : ६ , बीट : १ , घोसाळी :१

आवक जुड्यांमध्ये ः कोथिंबीर : १७००, मेथी : ७५०, शेपू : ८५०, पालक : ६५०, चवळी : ४५०, अंबाडी : ७५०

एकूण आवक
फळभाजी : १०८ क्विंटल
पालेभाजी : १२ क्विंटल
एकूण आवक : १२० क्विंटल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com