मूळ कर भरलेल्यांनाच शास्ती माफीचा लाभ

मूळ कर भरलेल्यांनाच शास्ती माफीचा लाभ

पिंपरी, ता. ५ ः अवैध बांधकामावर आकारली जाणारी शास्ती (दंड) सरसकट अर्थात सर्व प्रकारच्या बांधकामांना माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मूळ कराचा भरणा केल्यानंतरच शास्ती माफीचा लाभ मिळकतधारकांना मिळणार आहे. त्यासाठी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सर्व करसंकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाने घेतला आहे. शिवाय, मूळ कराची रक्कम भरल्यानंतर त्वरीत शास्ती माफीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. ते डाऊनलोड करण्यासाठी करसंकलन संगणक प्रणालीत महापालिकेने बदल केला आहे.

महापालिकेचे आवाहन
- मालमत्ताधारकांनी मूळ कर त्वरित भरून शास्ती माफीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे
- मूळ कर संपूर्ण भरणा केल्यानंतर लगेच शास्ती माफी प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल

नोंद नसल्यास...
- तीन मार्चपूर्वी नोंद केलेल्या सर्व अवैध बांधकामांना शास्ती माफी, पण नियमित नाहीत
- तीन मार्चपूर्वी अस्तित्वात असूनही नोंद नसलेल्या बांधकामांबाबत सरकारचे मार्गदर्शन घेणार

कर भरणासाठी...
- करसंकलन कार्यालये ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू
- नियमित वेळेनंतरही कार्यालये सुरू ठेवून कर भरणा स्वीकारणार

कर न भरल्यास...
- मालमत्ता कर न भरणाऱ्यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणार
- थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची मोहीम तीव्र करणार

‘‘अवैध बांधकामांची शास्ती माफ झाल्याने नागरिकांनी आता स्वतःहून मूळ कराचा संपूर्ण भरणा ३१ मार्च अखेर करून सहकार्य करावे. यापुढे शहरात कुठलेही अवैध बांधकाम होणार नाही, यासाठी कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. तीन मार्चनंतर होणाऱ्या बांधकामांना पूर्वीच्याच दराने शास्ती लागू राहणार आहे.’’
- शेखर सिंह, प्रशासक, महापालिका

निवासी मालमत्ता सर्वाधिक (कर व शास्ती कोटी रुपयांत)
प्रकार (चौ.फुट) / संख्या / मूळकर / शास्ती
१ ते १००० / ६६,०८३ / ९३.४२ / ---
१००१ ते २००० / १६,६४४ / ७०.८३ / ४९.७३
२००० पेक्षा अधिक / ३,७३४ / ३८.३२ / १३४.६३
एकूण / ८६,४६१ / २०२.५८ / १८४.३६
(शास्ती १८४ कोटी ३६ लाख माफ झाला असून मुळ कर २०२ कोटी ५८ लाख भरावा लागणार)

इतर मालमत्ता सर्वाधिक (कर व शास्ती कोटी रुपयांत)
प्रकार / संख्या / मूळकर / शास्ती
बिगर निवासी / ५,२३५ / ५९.३३ / १३४.७६
मिश्र / ५,२०७ / ४१.२७ / १०७.११
औद्योगिक / ७९६ / ८.०० / ३४.३२
एकूण / ११,२३८ /१०८.६० / २७६.१९
(शास्ती २७६ कोटी १९ लाख माफ झाला असून मूळ कर १०८ कोटी ६० लाख भरावा लागणार)

दृष्टिक्षेपात मिळकती
शहरातील एकूण मिळकती ः ५,९१,१५०
शास्ती माफ झालेल्या ः ९७,६९९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com