‘स्टार्टअप’, ‘फ्रिक्शन’मध्ये
द्विवार्षिक सामंजस्य करार

‘स्टार्टअप’, ‘फ्रिक्शन’मध्ये द्विवार्षिक सामंजस्य करार

पिंपरी, ता. ८ ः उद्योजक आणि स्टार्टअप उपक्रमांमधील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर (पीसीएसआयसी) आणि आर. फ्रिक्शन एंटरटेनमेंट, स्लेजेंड्स व्हेंचर्स यांच्यात दोन वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला.
ऑटो क्लस्टर येथील कार्यालयात स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, ऑटो क्लस्टरचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण वैद्य यांनी पीसीएसआयसीकडून तर आर. फ्रिक्शन एंटरटेनमेंट, लेजेंड्स व्हेंचर्स मार्फत संचालिका शर्वरी गवांदे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. व्यवस्थापक उदय देव, लेखापाल आदित्य मासरे उपस्थित होते. महापालिका, स्मार्ट सिटी व ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्यातर्फे ऑटो क्लस्टर येथे स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर उभारण्यात आले आहे. ऑटोमोटीव्ह इंजिनिअरींग, बायोफार्मा, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये नवनिर्मिती, सहयोग आणि उद्योजकता आदी क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी इनक्युबेशन सेंटरचे कामकाज सुरू आहे. सेंटरकडे आता १२ मार्गदर्शक असून सध्या ३० स्टार्टअप सक्रियपणे कार्यरत आहेत.
इनक्यूबेट्स व स्टार्टअप्समध्ये आवश्यक ज्ञानासह पिंपरी-चिंचवड आणि पुणे क्षेत्रात विविध सत्रे घेतली आहेत. नवनिर्मीतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आमंत्रित करून स्टार्टअपला सादरीकरणाची संधी देण्यात येते. विज्ञान, अभियांत्रिकी, कला, कृषी, तंत्रज्ञान, सामाजिक नवोपक्रम (आरोग्य, शिक्षण) इत्यादी विविध शाखांमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह नवीन उपक्रमांच्या सुविधा निर्माण करून त्यांना भौतिक, तांत्रिक, आर्थिक, नेटवर्किंग समर्थन आणि सुविधा अशा प्रकारे नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, असे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यादव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com