कार्यकर्त्यांनी ग्रामविकासाचा ध्यास घ्यावा
चांदखेडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

कार्यकर्त्यांनी ग्रामविकासाचा ध्यास घ्यावा चांदखेडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

सोमाटणे, ता. १२ ः जनतेचा विकास हेच पंतप्रधानांचे स्वप्न असल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामविकासाचा ध्यास घ्या, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांदखेड येथे व्यक्त केले.
मावळात बाळासाहेब घोटकुले यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गादर्शनाखाली प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरिबांना घरे ही शासनाची योजना गावोगावी राबवण्याचे काम हाती घेतले. यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मावळातील सतरा हजार गरजू कुटुंबांचे सर्वेक्षण केले. यातील एक हजार तीनशे कुटुंबांना यापूर्वीच घरकुलाचे वाटप झाले तर सहाशे कुटुंबांना नुकतेच मंजुरीपत्राचे वाटप झाले. यावर्षी मंजूर झालेल्या पाचशे कुटुंबाना आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री आवास योजना, जल मिशन योजना, जलसिंचन योजना, शेतकरी विमा संरक्षण योजना, अपघात विमा, हरघर नळ योजना, शेतकरी पेंशन योजना, शेतकऱ्यांना मदत, तरुणांच्या हाती काम आदी योजनांना
प्रथम प्रधान्य देऊन, त्या मार्गी लावण्याचे काम सुरु केले. राज्यातही शिंदे, फडणवीस सरकारनेही विकासाचे एक पाऊल पुढे उचलले असून, अर्थ संकल्पात ते सर्वांनी पाहिले आहे. या विकास कामासाठी गावागावातील कार्यकर्त्यांनी विकास कामाचा ध्यास घ्या, शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोचवा, त्यांचा पाठपुरावा करा, सरकार तुमच्या पाठीशी असून हे जनतेचे सरकार आहे. यासाठी विकासाची कास धरा.’’
या कार्यक्रमाआधी त्यांनी चांदखेड येथील बारमुख क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करून, क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्राच्या योजनांविषयी, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी राबवलेल्या शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले. गणेश भेगडे, रवींद्र
भेगडे, बाळासाहेब घोटकुले यांनी जिल्हा व तालुक्यातील पूर्ण झालेले विकास कामे व गरज असलेल्या विकास कामांविषयी मार्गदर्शन केले. गणेश भेगडे यांनी प्रास्ताविक केले. संतोष बांदल, दत्तात्रेय माळी, बाबूलाल गराडे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच मीनाताई माळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, निकिता घोटकुले, शांताराम कदम, नितीन घोटकुले, सरपंच कुलदीप बोडके, अजित आगळे, अमोल गोपाळे, राजेंद्र खांडभोर, लक्ष्मण भालेराव, प्रशांत ढोरे, संभाजी शिंदे, बाळासाहेब केदारी, सोपानराव म्हाळसकर, सुमित्राताई जाधव, साईलीताई बोत्रे, संदीप येवले, तानाजी येवले, दत्ता गुंड आदीसह पवनमावळातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ः ३०७१
--------------------------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com