‘नवी दिशा स्वच्छता प्रकल्पा’कडे दुर्लक्ष

‘नवी दिशा स्वच्छता प्रकल्पा’कडे दुर्लक्ष

पिंपरी, ता.१२ ः स्वच्छता मोहिमेमध्ये महिलांचा जास्तीत जास्त सहभाग आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवावा, या उद्देशाने महापालिकेकडून ‘नवी दिशा’ स्वच्छता योजना राबविण्यात येत आहे. मात्र फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत काम करणाऱ्या बचत गटांना त्रास दिला जातो, आरोग्य विभागाकडून जाणीवपूर्वक बिल काढण्यात विलंब करण्यात येतो, अशा तक्रारी बचत गटांकडून होवू लागल्या आहेत.

झोपडपट्टी परिसरातील स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा कामात आसपासच्या महिलांना जास्तीतजास्त सहभागी करण्यासाठी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी ‘नवी दिशा’ ही योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी परिसरातील महिलांच्या बचतगट किंवा मंडळांना सार्वजनिक शौचालय देखभाल दुरुस्ती व साफसफाईचे काम देण्याचा आदेश दिले आहेत. याबाबत समाज विकास विभागाने याबाबत क्षेत्रीय कार्यालयामुळे सुचना पत्र दिली आहेत.

असा दिला जातोय त्रास
निगडी प्रभाग १३ काळभोर गोठा दळवीनगर येथून श्री समर्थ महिला बचत गट आणि स्वविकास महिला बचत गट काम करतात. मात्र, कुठल्या प्रकारचे संसाधने, मॉनिटरी किंवा सुरक्षा साधने पुरवली गेलेली नाहीत. अधिकाऱ्यांकडून सहकार्य केले जात नाही. यापूर्वी ठेकेदार पद्धतीने सार्वजनिक शौचालय स्वच्छता, देखभाल दुरुस्तीचे काम पाहत होते. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे देखभाल किंवा पर्यवेक्षण ठरलेल्या वेळी व्हायचे. बिले मंजूर व्हायची. परंतु आता दिशा प्रकल्प बचत गटाला दिल्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. वेगवेगळ्या अडचणी सांगून बिलांना जाणीवपूर्वक विलंब करत आहेत. तासनतास वरिष्ठांच्या कार्यालयाबाहेर थांबावे लागत आहे. बचत गट, ठेकेदारी पद्धतीने तडजोड न केल्यामुळे बिल काढण्यासाठी अनेकवेळा प्रशासकीय कार्यालयात किंवा आरोग्य कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रारी, बचत गटांनाकडून येत आहेत.

कोट
बचत गटांचा अहवाल मागितला आहे. आरोग्य निरीक्षक आणि बचत गटांमध्ये समन्वय नसल्यामुळे बिल काढण्यास अडचण येत आहे. आता ताबडतोब त्यांची बिले काढण्यात येतील.
-शांताराम माने, सहाय्यक आरोग्य अधिकारी, फ क्षेत्रीय कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com