नव्या पिढीसाठी ‘यिन’चे व्यासपीठ उपयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या पिढीसाठी ‘यिन’चे व्यासपीठ उपयुक्त
नव्या पिढीसाठी ‘यिन’चे व्यासपीठ उपयुक्त

नव्या पिढीसाठी ‘यिन’चे व्यासपीठ उपयुक्त

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः ‘समाजात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी राजकारणात तरुणांना संधी आहे. पण राजकारणात करिअर करण्यासाठी अनुभवाची गरज असते. त्यासाठी तरुणांनी क्षमता आणि संयमी बनले पाहिजे. त्यासाठी यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल,’ असा सूर ‘यिन''च्या अधिवेशनात विविध राजकीय पक्षांतील शहराध्यक्षांनी व्यक्त केला.

‘सकाळ माध्यम समुहा’च्या यंग इन्‍स्पिरेटर्स नेटवर्कचे (यिन) पिंपरी-चिंचवडचे अधिवेशन अधिवेशन निगडी येथील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात झाले. या अधिवेशनात वक्त्यांशी संवाद साधताना युवकांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. सृष्टी सोनवणे व वैभवी देशमुख या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. दुसऱ्या सत्रात प्रा. रोहित गुरव यांनी मुलाखत घेतली. आभार यिनचे समन्वयक अक्षय बर्गे यांनी मानले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरेश चौंधे म्हणाले, ‘‘घराणेशाहीच्या परंपरेत तरुण कार्यकर्त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची संधी मिळते. पण संधीचे सोने करणे हे त्या कार्यकर्त्यावर अवलंबून असते.’’ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इमरान शेख म्हणाले, ‘‘राजकारणात येण्यासाठी त्यांच्या घरातील कुणी या क्षेत्रात नाही आणि त्यांच्याकडे पैसा नाही या दोन डाव्या बाजू सतत उजेडात आणून तरुणाईला केवळ दुसऱ्या रांगेतच बसवले जाते. पण स्वतःतील क्षमता विकसित केल्यावर राजकारणात यशस्वी झाल्‍याशिवाय राहणार नाहीत.’’
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे म्हणाले, ‘‘राजकीय पार्श्‍वभूमी नसतानादेखील ‘मनविसे’चे काम पाहतोय. विकासाशी जोडलेला तरुण या चौकटीतून राजकारणाकडे पाहणारी नेक्स्ट जनरेशन तयार होण्याची वेळ यंदा आली आहे.’’
शिवसेनेचे युवा सेनेचे शहराध्यक्ष अभिजित गोफण म्हणाले, ‘‘धोरण पटणारा पक्ष आणि नेता यांचे समर्थन करणे किंवा राजकारणात जाणे वाईट नाही. फक्त त्याला विचारांची आणि व्हिजनची साथ असेल तरच युवकांकडून आशादायक बदल होऊ शकतो.’’

यिनचे प्रतिनिधी म्हणतात
- सलोनी सिंग, यिन सभापती महाराष्ट्र राज्य ः सलोनी सिंग ‘‘गुणवत्ता असून चालत नाही. यशस्वी होण्यासाठी टिमवर्कची गरज असते.

- अभिषेक कोल्हे, यिन उपसभापती महाराष्ट्र राज्य ः यिनच्या माध्यमातून बरेच सामाजिक उपक्रम पुढील काळात राबवू व मिळालेल्या संधीचे सोने करू.

- चेतन निम्हण, यिन सार्वजनिक बांधकाम मंत्री ः अधिवेशनात योजना आखतो. पण त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे.

- श्रद्धा पठारे, यिन महिला व बालविकास मंत्री ः यिन’द्वारे मिळालेल्या संधीमुळे स्वतः सह इतर सदस्यांनी एकी दाखवावी.

- दिनेश भंडारी, यिन सांस्कृतिक मंत्री ः यिन’व्यासपीठाच्या माध्यमातून ग्रामीण युवकांनी वज्रमूठ बांधली पाहिजे.

- निखिल जोशी, यिन महापौर ः यिन'' युवकांचे हक्काचे व्यासपीठ आहे. याचा लाभ तरूणांनी घेतला पाहिजे.

- प्रतीक पोळ, यिन सचिव ः यिनच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी विरोध करण्यास शिकले पाहिजे.

- प्रज्वल काळे, यिन संघटक ः पदावर आल्यावर जबाबदारी कळते. यिनमुळे संघटन कसे करायचे, हे शिकलो.

- नीलेश चव्हाणके, अध्यक्ष, यिन रोजगार केंद्रीय समिती ः ‘यिनमुळे सोशल कनेक्ट वाढत आहे. यिनमुळे वेळेचे व्यवस्‍थापन,
संघटन, नेतृत्वगुण शिकलो. त्याचा आता व्यावसायिक जीवनात उपयोग होत आहे.

- गणेश दुधे, कार्याध्यक्ष, यिन रोजगार केंद्रीय समिती ः युवकांनी स्वप्नांना कागदावर लिहून काढा. त्या स्वप्नांचा पाठलाग करा. त्याचीदेखील डेडलाईन ठरावा. संपर्क वाढवून त्याचा उपयोग व्यावसायात करण्यास शिका.

30819