सलग दुसऱ्या दिवशी 
पावसाची हजेरी

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

पिंपरी, ता. १६ ः दिवसभर ढगाळ वातावरण, सायंकाळी जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने सलग दुसऱ्या दिवशी शहरात हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. चिंचवड परिसरात एक झाड पडले. गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण व सायंकाळी पाऊस अशी स्थिती आहे. बुधवारी रात्रीही आठच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. काहींनी भिजतच घर गाठले. तर काहींनी ग्रेड सेपरेटर, पूल, रस्त्याच्या कडेच्या दुकानांचा आसरा घेतला होता. गुरुवारीसुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरवातीला वाराही सुसाट होता. त्यामुळे चिंचवडमध्ये एक झाड पडले. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढत नागरिकांना घर गाठावे लागले. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, डांगे चौक आदी भागातील मंडईंसह पदपथांवर साहित्य विक्रीसाठी बसलेले पथारीवाल्यांना आडोसा शोधावा लागला.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com