Fri, March 24, 2023

गुंड नीलेश घायवळचे झळकले अनधिकृत फ्लेक्स
गुंड नीलेश घायवळचे झळकले अनधिकृत फ्लेक्स
Published on : 17 March 2023, 2:14 am
गुंड नीलेश घायवळचे झळकले अनधिकृत फ्लेक्स
पिंपरी, ता. १७ : गुंड नीलेश घायवळ याच्या वाढदिवसानिमित्त चांदणी चौक परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकले. हे फ्लेक्स उभारलयाप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चांदणी चौकात पाईपलाईन हायवे रोडलगत घायवळ तसेच इतर दोघांच्या वाढदिवसानिमित्त हे अनधिकृत फ्लेक्स उभारले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिस व पुणे महापालिकेच्या बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने संयुक्त कारवाई करून हे फ्लेक्स हटवले. याप्रकरणी क्षेत्रीय कार्यालयाचे परवाना निरीक्षक काळुराम घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेशभाऊ घायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घायवळ याच्यावर विविध पोलिस ठाणे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
------------------