शेतकरी, बांधकाम व्यावसायिकांची ११४ कोटींची फसवणूक

शेतकरी, बांधकाम व्यावसायिकांची ११४ कोटींची फसवणूक

पिंपरी, ता. २५ : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिक व शेतकऱ्यांची ११४ कोटी रुपयांची आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडला. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांसह वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार वाकड येथे घडला.

संजय पांडुरंग कलाटे (रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयंत वल्लभदास कनेरिया (वय ६९, रा. पाषाण), धीरजलाल गोरधनदास हंसालीया (६५, रा. बाणेर), मोहन पांडुरंग कलाटे (४२, रा. वाकड), निखिल वल्लभदास कनेरिया (६०), नीरज जयंत कनेरिया (४०), कुमार रणजित निम्हण (४३, सर्व रा. पाषाण), पवन कंकालिया (५२, रा. सहकारनगर, पुणे), विस्त्रा आयटीसी (इंडिया) लि. व मोतीलाल ओसवाल रियल इस्टेट इंव्हेस्टर ऍडवायजर प्रा. लि. यांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलिस ठाणे यांनीच करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. तरीही तपास पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे का वर्ग केला? तक्रारी प्रलंबित ठेवायच्या किंवा त्या तक्रारीला क्लीन चीट देण्याचे काम या शाखेमार्फत सुरु असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. यातील संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही यावेळी केली. या पत्रकार परिषदेस ॲड. सत्यजित काकडे, ॲड. किरण शिंदे, शेतकरी स्वप्नील कलाटे, रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे, सचिव रविराज काळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com