पिंपरी भाजी मंडईत 
भाजीपाल्याचे दर स्थिर

पिंपरी भाजी मंडईत भाजीपाल्याचे दर स्थिर

पिंपरी, ता. २६ : पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत फळभाजी १६७ क्विंटल तर, पालेभाजी अवघी २२ क्विंटल आवक झाली आहे. अशी मिळून एकूण १८९ क्विंटल भाजीपाल्याची आवक बाजारपेठेत झाली आहे. भाजीपाल्याचे दर अद्याप स्थिर असून महागाईच्या काळात गृहिणींना दिलासा मिळाला आहे. मात्र, अवकाळी पावसाचा परिणाम अद्यापही पिंपरी बाजारावर दिसून येत आहे. पालेभाज्यांची आवक त्या तुलनेत नेहमीपेक्षा कमी झाली आहे.

कांद्याची आवक सर्वाधिक बाजारात झाली असून दर १२ ते १४ रुपये आहे. ओला व सुकलेला दोन्ही प्रकारचा कांदा बाजारात दाखल होत आहे. तर, काकडी देखील बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून १७ ते २० रुपये प्रमाणे विक्री सुरू आहे. फ्लॉवर १५ ते १६, तर कोबी ७ ते ८ रुपये व वांग्याच्या विविध जातीप्रमाणे १० ते १७ रुपयांपर्यंत विक्री सुरू आहे. तर, कमाल दर वांगे विक्रीचा २० रुपये इतका आहे.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची जुडी ७ ते ८ रुपये, मेथी ७ ते ९ रुपये, शेपू, पालक व चवळी ६ ते ७ रुपये, पुदीना ३ ते ४ रुपये, मका ४ ते ६ रुपये प्रमाणे विक्रीचा दर आहे. सध्या भाजीपाला तुलनेत स्वस्त असल्याने भाजीपाल्याला अधिक मागणी आहे.

फळभाजी आवक क्विंटलमध्ये
कांदा : १०३, टोमॅटो : १९, काकडी : ३, फ्लॉवर : १६, कोबी : १६, वांगी : ४, मका : २

पालेभाजी आवक गड्डीप्रमाणे
कोथिंबीर : २४००, मेथी : १६००, शेपू : १८००, पालक : ८००, चवळी : ६५०, पुदीना : १६००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com