Wed, June 7, 2023

दहा लाखांचा
गुटखा पकडला
दहा लाखांचा गुटखा पकडला
Published on : 26 March 2023, 3:13 am
पिंपरी, ता. २६ : हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भूगाव रोड येथे पोलिसांनी दहा लाख रुपये किंमतीचा गुटखा पकडला. याप्रकरणी रामलाल चौगाजी चौधरी (वय ४५, रा. पुणे) या आरोपीला अटक केली. एकजण चांदणी चौक भूगाव रोड मार्गे गुटख्याने भरलेला टेम्पो घेऊन जाणार असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पहाटेच्या वेळी या मार्गावर सापळा रचला. सफेद रंगाचा गुटख्याने भरलेला टेम्पो आल्यानंतर त्यास थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने टेम्पो न थांबवता पळून जाऊ लागला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करून भूगाव रोड येथे त्याला ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये नऊ लाख ९५ हजार २८८ रुपये किंमतीचा गुटखा आढळला. पोलिसांनी गुटखा व सहा लाखांचा टेम्पो असा एकूण १५ लाख ९५ हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-------------------