शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरामध्ये आज 
पाणीपुरवठा बंद
शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद

शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रात करण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. १५) बंद राहणार आहे. परिणामी शहरातील काही भागात गुरुवारी सकाळी ८ ते मध्‍यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. तसेच शुक्रवारी पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होईल. त्यामुळे पिंपरी- चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, आर ॲण्ड डी दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.