ऑटिझम स्पर्धेत अभिसार फाउंडेशनची लक्षणिय कामगिरी

ऑटिझम स्पर्धेत अभिसार फाउंडेशनची लक्षणिय कामगिरी

पिंपरी, ता. ३ : इंडियन स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ ऑटिझम यांच्या वतीने २७ व २८ डिसेंबर पटना, बिहार येथील पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १०० मीटर, २०० मीटर धावणे, चालणे, डिस्क थ्रो, शॉट पुट, लांब उडी, सॅडिंग जम्पिंग याचा समावेश होता. स्पर्धेत १२ राज्यातील एकूण ३२७ ऑटिझम खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत अभिसार फाउंडेशन, वाकड पुणे येथील ऑटिझम खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून महाराष्ट्र राज्याचा नाव लौकिक देशात वाढवला. यामध्ये आरुष धायगुडे याला १०० मीटर धावणेमध्ये सिल्वर मेडल, क्लबमध्ये गोल्ड मेडल, यश मोहिते याला क्लब थोमध्ये सिल्वर मेडल, आदित्य नाडकर्णी याला क्लब थोमध्ये ब्रॉंझ मेडल मिळाले. या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक विकास जगताप व योगेश आढले यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार दिव्यांग आयुक्त डॉ.शिवाजीकुमार यांनी मानले. या कामगिरी बदल लायन्स क्लब ऑफ रहाटणी, वुई टुगेदर फाउंडेशन, नागरिक, पालक संघ यांच्याकडून खेळाडू व प्रशिक्षक यांचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com