जैन इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

जैन इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

जैन इंग्लिश स्कूलमध्ये
देशभक्तीचा संदेश

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १२ : जैन इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित स्नेहसंमेलनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही संकल्पना राबवून देशभक्तीचा संदेश दिला. अभिनेते सुमीत पुसावळे हे प्रमुख पाहुणे होते. अभिनेत्री भक्ती रत्नपारखी या उपस्थित होत्या. किरण परळीकर यांचा मधुगंधर्व अकादमीचा कार्यक्रम झाला.
तळेगावचे पोलिस निरिक्षक मारोती मंडेलवाल, डॉ. शालीग्राम भंडारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कोरिओग्राफर गगनसिंग, मंगेश जाधव, सनी शेख यांचे विशेष सत्कार करण्यात आले.प्रकाश ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष डॉ. दीपक शहा यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी जीनल पालरेषा, ॲड. विनय दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला. विलास शहा, तेजस वाडेकर, राकेश ओसवाल, संकेत ओसवाल, रणजित ओसवाल, महेंद्र राठोड, दिलीप वाडेकर, रिकबचंद गुंदेशा उपस्थित होते. स्नेहसंमेलनासाठी विजया शिंदे, शुभांगी भोईर, अपूर्वा टकले यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन सुचित्रा भोर, आशा नंबियार, कविता फाकटकर यांनी केले. आभार दिलीप पारेख यांनी मानले.

१७७८६
तळेगाव दाभाडे ः जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही संकल्पना साकारताना विद्यार्थी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com