मोरवाडी आयटीआयमध्ये
उद्या महारोजगार मेळावा

मोरवाडी आयटीआयमध्ये उद्या महारोजगार मेळावा

पिंपरी, ता. १९ ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र; महापालिका व बानाई संस्था यांच्यातर्फे शुक्रवारी (ता. २१) सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी येथे महारोजगार मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पुणे व पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रामधील खासगी उद्योजक मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडून सुमारे दोन हजारापेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. यासाठी दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविकाधारक, अभियांत्रिकी पदवी, एमबीए, बीसीए उत्तीर्ण पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र आहेत. इच्छुकांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. तसेच https://tinyurl.com/PCMC-ROJGAR-2023 या लिंकवर नोंदणी करावी. मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या छायांकित प्रतीसोबत आणाव्यात, असे आवाहन प्रशासक शेखर सिंह व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com