विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 
ऑनलाईन मॉक टेस्ट सिरीज

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन मॉक टेस्ट सिरीज

पिंपरी, ता. ३० ः भारतीय जनता पक्ष प्रदेश युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) सीईटी फॉर इंजिनिअरिंग, सीईटी फॉर फार्मसी, नीट फॉर मेडिकल, जेईई फॉर इंजिनिअरिंग, सीईटी फॉर लॉ यांच्या तयारीसाठी राज्यातील विद्यार्थ्यांना www.bjpexams.in या संकेतस्थळावर मोफत ऑनलाइन सराव परीक्षा मालिका (मॉक टेस्ट सिरीज) आयोजित केली आहे, अशी माहिती भाजयुमो प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांनी दिली.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांसाठी सतत चांगले उपक्रम राबवले जातात. शहरी व ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांची क्‍लासेस लावण्याजोगी आर्थिक परिस्थिती नसते. परिणामी त्यांना अभ्यासाला मुकावे लागते. या ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून मोफत वस्तुनिष्ठ प्रश्‍न उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा सराव केल्यास मेडिकल, अभियांत्रिकी व कायदा अभ्यासक्रम करण्यास महाविद्यालयीन प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी लिंकवर नावनोंदणी करावी. सात लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना याची अंतिम परीक्षेला मदत होणार आहे, असेही मोरे यांनी सांगितले.

उपक्रमाचे स्वरूप
- ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीजमध्ये प्रत्येक चाप्टरवर आधारित स्वतंत्र टेस्ट होईल
- विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार सहभागी होऊ शकतात
- टेस्ट दिल्यानंतर लगेच निकाल व निकालाचे विश्लेषण होईल
- www.bjpexams.in या संकेतस्थळाद्वारे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात
- संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईलवर घरबसल्या परीक्षेची सुविधा
- दहा हजाराहून अधिक प्रश्‍न विश्लेषणासह समाविष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com