सोमाटणे चौकामध्ये
सातत्याने वाहतूक कोंडी

सोमाटणे चौकामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी

सोमाटणे, ता. १ ः पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी तातडीने उपाययोजना करण्याची वाहनचालकांनी मागणी केली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे चौकात पुणे-मुंबई महामार्ग, द्रुतगती बाह्यामार्ग, सोमाटणे शिरगाव रस्ता, सोमाटणे परंदवडी रस्ता आदी सर्व रस्ते एकत्र येत असल्याने दररोज सकाळ व संध्याकाळी वाहनांची संख्या प्रचंड वाढते. त्यातच सोमाटणे येथे टोलनाका असल्याने टोल भरण्यासाठी अवजड वाहने थांबत असल्याने अनेक छोटी वाहन चालक पुढे जाण्या
साठी वाहने एकमेकांच्या पुढे घुसवण्याच्या प्रकार करत असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीच्या वेळी महामार्ग पोलिसांनी ती सोडवण्यासाठी वाहने पुढे घुसवणाऱ्या
ावाहनचालकांना शिस्त लावण्याची गरज असताना पोलिस सोमाटणे चौकात न थांबता टोलनाक्यावर दंडात्मक कारवाई करण्यात गर्क असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी ती आणखी वाढते. वाहतूक पोलिसांनी सकाळ संध्याकाळ सोमाटणे चौकात थांबवून वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

फोटो ः ४०३९०
Smt1Sf2.
---------------------------------------------------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com