चला, पारंपरिक खेळ खेळूया !

चला, पारंपरिक खेळ खेळूया !

पिंपरी, ता. ५ ः पूर्वी शाळेला सुटी लागल्यानंतर गल्ली-बोळात लपा-छपी, गोटया, चिपळ्या, सागरगोटे इत्यादी खेळासोबत बालचमूंचा किलबिलाट असायचा. परंतु हल्ली इंटरनेटच्या या काळात हे खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सोसायटीच्या या महानगरीत, मैदानाअभावी मुले घरातच टीव्ही पाहणे व मोबाईलवर गेम खेळण्यातच गुरफटून चालली आहेत. अशा मुलांसाठी ओम प्रतिष्ठानच्यावतीने ६ ते १० मे दरम्‍यान, सर्व वयोगटातील मुलांसाठी पारंपरिक खेळाचे मोफत आयोजन केले आहे.
रावेत-लक्ष्मीनगर येथील विद्यांगण हायस्कूलच्या आवारात सायंकाळी पाच ते सात यावेळेत खेळ घेण्यात येणार आहे. विट्टी-दांडू, गोटया, भोवरा, चिपळ्या, सागरगोटे, चल्लस-आठ, रुमाल उडवी, कांदा-फोडी, कोया, चाकाची चक्री, लिंगोरचा, अप्पा-रप्पी, गिलोरी, आट्या-पाट्या इत्यादी खेळ शिकविले जाणार आहेत. या खेळांमुळे मुले सुदृढ तर बनतीलच. परंतु त्या सोबतच मुलांचे संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, निर्भीडपणा, चपळता, सांघिक वृत्ती, अचूक अंदाज बांधणी इत्यादी गुण वाढीस लागतात. परिणामी, मुलांचे शारीरिक व मानसिक संतुलन विकसित होण्यास मदत होते. पारंपरिक खेळाच्या माध्यमातून निखळ आनंद व मनोरंजनातून व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी, सर्व पालकांनी आपल्या पाल्याचा सहभाग अवश्य नोंदवावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा वनिता सावंत यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com