पिंपरी चिंचवड शहरात बुद्धम शरणंम् गच्छामि...

पिंपरी चिंचवड शहरात बुद्धम शरणंम् गच्छामि...

पिंपरी, ता. ५ ः ‘‘अवघ्या विश्वाला दया, क्षमा, शांती, अहिंसा आणि मानवतेची शिकवण’’ देणारे तथागत भगवान गौतम बुद्धपौर्णिमे दिनी अनुयायांनी त्रिवार वंदन केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनुयायांनी सकाळपासून पांढरे वस्‍त्र पेहराव करून सामूहिक धम्मवंदना केली. महाविहारात मेणबत्ती लावून पूजा करण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहरात बौद्ध धर्मीयांच्या घराघरांत, बौद्ध विहार व महाविहारात सकाळपासून अनुयायांची लगबग होती. त्यांनी दिवे प्रज्वलित केले. बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले. समाज बांधवांनी घरांमध्ये फुलांची सजावट केली होती. बुद्धमुर्तीस फुले अर्पण केले व अगरबत्त्या व दिवे प्रज्वलित करून पूजा करण्यात आली. काही ठिकाणी बोधीवृक्षाची पूजा करण्यात आली. बोधीवृक्षाच्या फांद्यावर हार व रंगीत पताका सजविण्यात आल्या होत्या. बौद्‍ध बांधवांतर्फे गोरगरिबांना वस्त्र आणि अन्नदान करण्यात आले.

सामूहिक धम्मवंदना
चिंचवड स्टेशन येथे रिपब्लिकन जनशक्ती पक्ष आणि आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल यासंघटनातर्फे भगवान गौतम बुद्धपौर्णिमा साजरी करण्यात आली. पक्षाचे प्रदेक्षाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थित भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मेणबत्ती लावून पूजा करण्यात आली. तसेच सामूहिक धम्मवंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन युवक अध्यक्ष माऊली भोसले यांनी केले होते. मोरे म्हणाले, ‘‘तथागत भगवान बुद्ध यांनी दिलेली अहिंसा व मानवता वादाची शिकवण समाजामध्ये रुजविणे गरजेचे आहे. ’’ सूत्रसंचालन युवक अध्यक्ष माऊली भोसले यांनी केले. यावेळी आदित्य काळे, सिकंदर शेख, आर्यन भोसले, श्रीहरी चव्हाण, दीपाली भोसले, सुजाता पाटोळे, बोधल गायकवाड, अनिल पवार, सूरज शेख, रमेश बवले, रूपेश राजू उपस्थित होते.

भीमशक्ती विद्यार्थी आघाडीतर्फे अभिवादन
भीमशक्ती विद्यार्थी आघाडी कमिटीच्यावतीने पिंपरी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे सामूहिक बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी भीमशक्ती विद्यार्थी आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सूरज गायकवाड, कार्याध्यक्ष परमेश्वर निसरगंध, गौतम गायकवाड, विशाल केंगार, आदित्य काळे, शुभम कांबळे, सिद्धू कांबळे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अजय शेरखाने, लहू साळुंखे, अमोल शिनगारे, लक्ष्मण कुलाली, बसवा मगी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे वस्ती, रावेत महाकस्सप महाविहारात वैशाख पौर्णिमेला तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला. यासाठी ही तिथी बुद्ध पौर्णिमा नावाने ओळखली जाते. या पौर्णिमेच्या निमित्ताने महाकस्सप महाविहार येथे भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com