फुटबॉल स्पर्धेत पीसीसीओई संघ अजिंक्य

फुटबॉल स्पर्धेत पीसीसीओई संघ अजिंक्य

पिंपरी, ता. ५ ः पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे आयोजित ‘युवोत्सव २०२३’ मध्ये फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पीसीसीओई संघाने अजिंक्यपद पटकावले. एमयुसीसी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मुले व मुली अशा विभागात फुटबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस स्पर्धा झाल्या. त्यात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महाविद्यालयांतील ८५ संघ सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण नेमबाज पूजा घाटकर, उद्योजक विजय राठोड, एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांच्या हस्ते झाले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अमरीश पद्मा, विद्यार्थी प्रतिनिधी योगेश आवटे, काव्यश्री पाटील, शुभम फडतरे, दिव्या वर्पे यांनी स्पर्धेचे संयोजन केले. डॉ. काजल माहेश्वरी यांनी आभार मानले. राहुल खर्चे, संतोष कुंभार, मंजुनाथ हिरेमठ, शिवप्रसाद शेट्टी, अभिजीत नायडू, विशाल निकम, भरत कोल्हे यांनी पंच म्हणून काम पाहिले. घाटकर म्हणाल्या, ‘‘खेळामध्ये नेहमीच आपण विजयी होऊ अशी परिस्थिती नसते. अनेक वेळा पराभवाचा सामना करावा लागतो. त्यातून अपयशाला सामोरे जाण्याची हिंमत मिळते. याचा उपयोग आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाताना होतो. म्हणून शालेय जीवनात विविध क्रीडा प्रकार खेळले आणि शिकले पाहिजेत.’’


अन्य क्रीडा स्पर्धांचे निकाल
क्रिकेट ः डी. वाय. पाटील मुलांचा संघाने विजेतेपद व ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेन्टरने उपविजेतेपद मिळवले. इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या मुलींच्या संघाने डी. वाय. पाटील पिंपरी संघावर अंतिम सामन्यात मात केली.
टेबल टेनिसम ः आरएससीओईच्या शॉनक सांपूरकरने विजेतेपद आणि एमआयटीच्या ओम चिलेवारने उपविजेतेपद पटकावले.
उत्कृष्ट खेळाडू ः कौशल कुटे, सायली गोसावी यांना मालिकावीर; उत्कृष्ट गोलकीपर शरद पिल्लाई, सर्वाधिक गोल केलेला यश देशमुख, उत्कृष्ट खेळाडू शरद पिल्लाई यांचा गौरव केला.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com