‘संशोधनात नवनवीन कल्पना 
अमलात आणल्या पाहिजेत’

‘संशोधनात नवनवीन कल्पना अमलात आणल्या पाहिजेत’

पिंपरी, ता. ७ ः ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात टिकून राहायचे असेल तर काळानुरूप बदलते तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. तसेच संशोधन कार्यात सातत्य ठेवून नवनवीन कल्पना अमलात आणल्या पाहिजेत,’’ असा सूर मान्यवरांनी चर्चासत्रात काढला.
पुनावळे येथील लोटस बिझनेस स्कूलच्या वतीने ‘सिनोवेशन -२३’ विषयीच्या दोन दिवशीय परिसंवाद व चर्चासत्र घेण्यात आले. टेक्नोफोर इलेक्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत नानजकर, फार्म ईआरपीचे सहसंस्थापक संजय बोरकर, एवन्स लॅबचे संचालक अतुल कालुस्कर, लोटस बिझनेस स्कूलचे विश्वस्त चारूदत्त बोधनकर, संचालक डॉ सतीश वरपडे आदी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात एजाइल टेक्नॉलॉजी या विषयावर आयोजित चर्चासत्रात स्ट्रीबेन हेल्थकेअरचे सीईओ अरविंद सावरगावकर, नायक्रोम इंडियाचे उपाध्यक्ष सुधीर इनामदार, लिनवे एनर्जीचे संस्थापक श्रीरंग चांदेकर, पोड्रॉंनचे सीईओ अनिल गुप्ते, ॲग्रोस्टारचे अक्षय हळबे यांनी मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी मनुष्यबळ विकास संसाधन या विषयावर परिषद घेतली. प्रास्ताविक स्वामी सेवाभावी संस्थेचे विश्वस्त चारुदत्त बोधनकर यांनी केले. स्वागत संचालक डॉ. सतीश वरपडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राजक्ता गाजरे तर आभार समन्वयक डॉ गणेश पाठक यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com