राजकीय स्वार्थाचा सामाजिक न्यायात अडथळा

राजकीय स्वार्थाचा सामाजिक न्यायात अडथळा

पिंपरी, ता. ७ ः ‘‘शोषणमुक्त अन् समतायुक्त समाज निर्माण करण्यासाठी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेण्यात येतात. भारतीय संविधानातील सर्वोच्च स्थानावर आदिवासी महिलेची निवड करण्यात येऊनही विरोधकांनी केलेली टीका अनाकलनीय आहे. विरोधकांचा राजकीय स्वार्थ हा सामाजिक न्यायातील अडथळा आहे,’’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. गुरूप्रकाश पासवान यांनी केले.

निगडी प्राधिकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत ‘सामाजिक न्याय की भारतीय अवधारणा’ विषयावर डॉ. पासवान बोलत होते. उद्योजक आशुतोष खंडकर, मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे आदी उपस्थित होते. डॉ. पासवान म्हणाले, ‘‘समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आमची वाटचाल सुरू आहे. परंतु सामाजिक न्यायासंदर्भात अनेक भ्रम निर्माण केले जातात. स्वातंत्र्यप्राप्तीचे सर्व श्रेय फक्त एकाच परिवाराला देणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या उक्ती अन् कृतीत महद् अंतर आहे. १९५२ पासून राज्यसभेवर दलितांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात नव्हते. या सात-आठ वर्षांपासून परिस्थिती बदलली आहे. बाबू जगजीवनराम, बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांना फक्त दलितांचे अन् वंचितांचे नेते म्हणून सीमित करण्यात येते. आत्ता तर जातीनिहाय जनगणना करण्याचा दुराग्रह करण्यात येतो आहे.’’
राजेंद्र देशपांडे यांनी परिचय करून दिला. व्याख्यानमाला प्रमुख शिवानंद चौगुले, सहप्रमुख विकास देशपांडे यांनी संयोजन केले. सागर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संपदा रानडे यांनी पसायदान सादर केले.

राष्ट्रहित सर्वोच्च स्थानी असावे
कलम ३७० हटवायला आणि सीएए कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी होणारा विरोधही राजकीय स्वार्थापोटी आहे.‌ लोकशाहीत वैचारिक विरोधाचे स्वागत आहे; परंतु कोणत्याही गोष्टीचा विरोध करताना राष्ट्रहित सर्वोच्च स्थानी असले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. गुरूप्रकाश पासवान यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com