गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

चार वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन करणारा अटकेत
पिंपरी : शौचालयास गेलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी रविवारी (ता. ७) म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने फिर्याद दिली असून सच्चिदानंद राजेंद्र विश्वकर्मा (रा. मूळ उत्तर प्रदेश, सध्या वराळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार रविवारी (ता. ७) वराळे गावच्या हद्दीत घडला. फिर्यादी यांची चार वर्षाची मुलगी शौचालयास गेली असता आरोपी तिच्या पाठीमागे गेला व त्याने मुलीचे लैगिंक शोषण केले. हा प्रकार मुलीने आईला सांगितला असता, त्यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बदनामीची धमकी देत पैशांची मागणी
पिंपरी : फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून महिलेची बदनामी करत पैशांची मागणी केली. या प्रकरणी रविवारी (ता. ७) भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक लक्ष्मण ठाकूर (रा. धुळे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १ एप्रिल पासून सुरु होता. आरोपी याने फिर्यादी यांचे फेक इन्स्टाग्राम अकाउंट बनवले. त्यावर फिर्यादी सोबत नकळत काढलेले फोटो पोस्ट करून ते फिर्यादीचे पती, मित्र व नातेवाइकांना शेअर करण्याची धमकी दिली. तसेच ई-सेवा केंद्रात झालेली नुकसान भरपाई म्हणून ७० हजार रुपये दे नाही तर फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

किरकोळ वादातून टोळक्यानी पसरवली दहशत
पिंपरी : फुटपाथवर बसल्याने झालेल्या वादातून टोळक्याने राडा घालत वाहनांची तोडफोड केली. तसेच, आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये आला तर खून करून टाकू असे म्हणत दहशत पसरवली. हा प्रकार शुक्रवारी (ता. ५) रात्री आठ वाजता चिखलीतील म्हेत्रे गार्डन येथे घडला. या प्रकरणी चिखली पोलिसांनी एक आरोपीसह तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मॉडेल ऊर्फ विशाल गंजे व तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर निखिल पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र डॉबर ऊर्फ आदित्य हे गार्डन जवळ बोलत बसले असताना आरोपी तेथे आले व त्यांनी तू इथे का बसला आहेस म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी जीवे मारण्याची धमकी देताच फिर्यादी व त्यांचा मित्र तेथून निघू गेले. त्यानंतर पुन्हा फिर्यादी यांना गाठून कोयत्याने गळ्यावर वार केले. ते फिर्यादींनी चुकविले. तसेच दहशत पसरविण्यासाठी परिसरात गाड्यांची तोडफोड करत नागरिकांनाही दमदाटी केली. आम्ही इथले भाई आहोत. आमच्या मध्ये कोणी यायचे नाही, नाही तर मर्डर करून टाकू अशी धमकी दिली. यावरून चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com