मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

मोबाईल चोरणाऱ्या
दोन जणांना अटक
पिंपरी, ता. ८ : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने तांत्रिक तपास करत सात लाख १० हजार रुपयांचे ६९ मोबाईल जप्त केले. या प्रकरणी दोघा चोरट्यांना अटक केली आहे. या कामगिरीमुळे एमआयडीसी भोसरी ठाण्यातील सात आणि सांगवी पोलिस ठाण्यातील दोन असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सोमा दुर्गप्पा चौधरी (वय- १९, रा. मुन्नाभाई चाळ, पिंपरी), मुद्‌स्सर अहमद सय्यद (वय- २१, रा. वल्लभनगर) यांना अटक केली आहे. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.
मोबाईल चोरीचा वाढत्या गुन्ह्यांबाबत पोलिस आयुक्तांनी सूचना दिल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने समांतर तपास करण्यात सुरवात केली. चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्‍लेषण करीत आरोपींची ओळख पटवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com