आळंदी एमआयटी महाविद्यालयात
गणित विषयाचे संशोधन केंद्र सुरू

आळंदी एमआयटी महाविद्यालयात गणित विषयाचे संशोधन केंद्र सुरू

पिंपरी, ता. ९ ः आळंदीतील एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात गणित विषयाचे संशोधन केंद्र सुरू करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता दिली आहे. महाविद्यालयात एमएससी (इंडस्ट्रियल मॅथ्यमॅटिकस् कम्प्युटर ॲप्लिकेशन), संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, वाणिज्य व जनसंवाद पत्रकारिता असे पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमही शिकविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना गणिताच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. गणितीय ज्ञानाच्या प्रगतीला आणि वास्तविक जगाच्या समस्यांसाठी नावीन्यपूर्ण उपायांना प्रोत्साहन देणे, संशोधकांना जटील गणिती समस्यांचा सखोल अभ्यास करण्यास आणि विविध क्षेत्रांमध्ये व्यावहारिक अनुप्रयोग असलेले नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास सक्षम करणे व समाज आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देणे हा संशोधन केंद्रचा प्रमुख उद्देश असेल, असे मत प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. या संशोधन केंद्राची स्थापना हे महाविद्यालयसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे गणित विभागप्रमुख डॉ. प्रदीप पानसरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com