पाचशे महिलांना शौर्य प्रशिक्षण

पाचशे महिलांना 
शौर्य प्रशिक्षण

पिंपरी, ता. १० ः हर घर दुर्गा अभियान साजरे करताना भारतीय संस्कृती मंच आणि मणिकर्णिका प्रतिष्ठान यमुनानगर (निगडी) यांच्यावतीने मोफत महिला शौर्य प्रशिक्षण पार पडले. शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून समुपदेशक प्रा. निवेदिता काच्छावा उपस्थित होत्या. प्रशिक्षक म्हणून सिलंबम आंतरराष्ट्रीय विजेते विजय टेपगुडे यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. प्रा. कच्छवा यांनी महिलांचे स्वसंरक्षण आणि सामाजिक भान यावर व्याख्यान दिले. तसेच महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या फड यांनी महिलांना सुरक्षित कसे राहावे? याबाबत संदेश दिला. सर्व प्रशिक्षणार्थी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत लाठी काठीचे प्रत्यक्षिक केले. नंदकुमार कुलकर्णी यांनी भारतीय संस्कृती मंच व मणिकर्णिका प्रतिष्ठानची माहिती दिली. तसेच आंतरराष्ट्रीय योगशिक्षक चंद्रकांत पांगारे यांच्या विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या योगासनांची प्रात्यक्षिके दिली. शिबिरात सुमारे ५०० प्रशिक्षणार्थीं महिला सहभागी झाल्या होत्या.
या प्रसंगी काही महिला खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. त्यात पिंपरी चिंचवड शहराची ‘स्वच्छ भारत’ अभियानाची ब्रॅण्ड अँबेसेडर व शिव छत्रपती पुरस्कार विजेती कबड्डी खेळाडू पूजा शंकर शेलार, केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या विभागात निवड झालेली कासारवाडी येथील धावपटू व रोइंग या क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळवलेली वैभवी गणेश मोटे, रोलबॉल या खेळात राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली वैष्णवी दिनेश कुलकर्णी व सायकलपटू व धावपटू ऋचा जोशी व नेटबॉल या खेळात विद्यापीठ स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेली ज्योती खुडे यांचा समावेश होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदित्य कुलकर्णी, गिरीश देशमुख, मुक्ता गोसावी, शिल्पा नगरकर, शर्मिला ब्रम्हे, मीनल शुक्ल,प्रिया देशमुख, सुजाता मटकर, अनघा काळे, योगिता शाळीग्राम, अदिती धुळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
अनुष्का वैशंपायन यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शर्वरी येरगट्टीकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com