भोसरीत ‘आप’ची 
सदस्य नोंदणी सुरू

भोसरीत ‘आप’ची सदस्य नोंदणी सुरू

पिंपरी, ता. १० : भोसरी विधानसभा मतदार संघात ‘आम आदमी पार्टी’च्यावतीने बुधवार (ता. १०) पासून सदस्य नोंदणी अभियानाला सुरवात झाली.
भोसरी ‘एमआयडीसी’तील ‘जे’ ब्लॉक येथील रिक्षा तळावर २० रिक्षांना फलक व बॅनर लावून, ऑनलाइन व प्रत्यक्ष आम आदमी पार्टीचे सदस्य व्हा, असे आवाहन करण्यात आले.
‘आप’ महिला आघाडीच्या अध्यक्षा सीता केंद्रे म्हणाल्या, ‘‘आम आदमी पक्ष देशात सामान्य जनतेच्या आकांक्षा परिपूर्ण करणारे व्हीजन मिशन घेऊन दिल्ली, पंजाब येथे लोकाभिमुख कार्य करत आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात कष्टकरी श्रमिक वर्गाची मोठी संख्या आहे. येथील चाळीचाळीत, छोट्या घरकुलात राहणाऱ्या श्रमिक, अंगमेहनती महिला, रिक्षा, पथ व्यावसायिक तसेच औद्योगिक कामगारांच्या आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा आदि विविध समस्या आहेत. त्या सोडविण्याचे काम आम्ही करणार आहोत.’’
सर्वसामान्य माणूस व रिक्षाचालक यांचे अतूट व विश्वासाचे नाते असते. त्यामुळे रिक्षाना फलक व फ्लेक्स लावून शहरात आम आदमी पार्टीचा प्रचार सुरू करण्यात येत आहे.
यावेळी आपचे पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते प्रकाश हगवणे, भोसरी विधानसभा दत्तात्रेय काळजे, माया सांगवे, दत्तात्रेय सांगवे आदी उपस्थित होते.
फोटो ः 42097

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com