संस्कार वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद

संस्कार वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद

संस्कार वर्गास
मुलांचा मोठा प्रतिसाद

पिंपरी, ता. १० ः मोरवाडी येथे देऊबाई कापसे उद्यान सभागृहात ज्येष्ठ नागरिक संघ मोरवाडी आणि साने गुरुजी कथामाला शाखा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने ‘संस्कार वर्ग’ भरविण्यात आले आहे. या संस्कार वर्गास मुलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
संस्कार वर्गात प्रज्ञा माडगूळकर यांनी सर्वांग सुंदर व्यायाम घेतला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते शिवदास हांडे आणि वक्त्या सुमेधा करंदीकर यांनी अनुक्रमे महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर साने गुरुजी कथामाला शाखा अध्यक्ष बी. आर. माडगूळकर यांनी ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना घेतली. शिवदास महाजन म्हणाले, ‘‘संस्कार वर्ग ही काळाची गरज आहे. हल्ली तरुण पिढी टीव्ही आणि मोबाईलच्या आहारी गेली आहे. तिला वाचविण्यासाठी साने गुरुजींचे विचार खूपच उपयुक्त आहेत.’’
यशवंत आपटे यांनी एक प्रेरणादायक प्रसंग सांगितला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सुमेधा करंदीकर म्हणाल्या, ‘‘साने गुरुजींचे विचार अजरामर आहेत. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. तोपर्यंत या पृथ्वीवर साने गुरुजींचे विचार राहतील, कारण त्यांच्या विचारांमध्ये जातीभेद धर्मभेद पंथ भेद नाहीत. ते सांगतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सध्याचे युग अणुयुग आहे. सध्या रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध चालू आहे. सध्या समाजाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. युद्धामध्ये अनेक निरपराधी माणसे मारली जातात. देशाच्या प्रगतीसाठी शांतता आवश्यक आहे. साने गुरुजी म्हणत असत मला एक सहस्रांश स्वामी रामकृष्ण परमहंस एक सहस्रांश रवींद्रनाथ टागोर आणि एक सहस्रांश महात्मा गांधी पाहिजे आहे, असे व्हायचे आहे. सभोवतालचा सारा समाज सुशिक्षित प्रेम अमळ प्रेममय व्हावा, म्हणून माझा प्रयत्न चालू असतो.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com