औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना
हृदयविकाराच्या झटक्यातून बचावाचे धडे

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना हृदयविकाराच्या झटक्यातून बचावाचे धडे

पिंपरी, ता. ११ ः महापालिका, वायसीएम रुग्णालय, स्मार्ट सिटी व अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटना (सोसायटी ऑफ ॲनेस्थेसियोलॉजिस्ट) पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे अजंठानगर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत प्राण कसे वाचवायचे याबाबत प्रशिक्षण दिले. वायसीएमच्या डॉ. उज्ज्वला अंदुरकर, डॉ. मनीषा सूर्यवंशी यांनी ‘अवयव दान’ विषयावर मार्गदर्शन केले. प्राचार्य शशिकांत साबळे, गटनिदेशक ए. एस. मोरे, एस. बी. पावडे, शिल्पनिदेशक डी. एस. वानखेडे आदी उपस्थित होते. प्रत्येक नागरिकाला जीवनरक्षक बनविणे हेच ध्येय समोर ठेवून ॲनेस्थेसियोलॉजिस्टद्वारे सामान्य नागरिकांसाठी विनामूल्य जागरूकता कार्यक्रम घेण्यात येतो. प्रत्येक नागरिक जीवन वाचवू शकतो. या उद्देशाने सोसायटी ऑफ ॲनेस्थेसियोलॉजिस्ट पिंपरी-चिंचवड, इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेसियोलॉजिस्ट यांच्यातर्फे जनजागृती करण्यात आली.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com