online Payment
online Paymentesakal

Online Property Tax : पिंपरी-चिंचवडकरांची मिळकतकर भरण्यासाठी ‘ऑनलाइन’ला पसंती

मिळकतकराचा अधिकाधिक भरणा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी निरंतर कर वसुली, सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण आणि माहितीचे शुद्धीकरण अशी त्रिसूत्री आखून कार्यवाही सुरू केली आहे.
Summary

मिळकतकराचा अधिकाधिक भरणा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी निरंतर कर वसुली, सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण आणि माहितीचे शुद्धीकरण अशी त्रिसूत्री आखून कार्यवाही सुरू केली आहे.

पिंपरी - मिळकतकराचा अधिकाधिक भरणा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी निरंतर कर वसुली, सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण आणि माहितीचे शुद्धीकरण अशी त्रिसूत्री आखून कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अवघ्या दीड महिन्यात शहरातील ८७ हजार ४५६ मिळकतधारकांनी शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचा कर भरला आहे. त्यात ७० हजार ४८९ नागरिकांनी सुमारे ८० कोटी रुपयांचा ऑनलाइन करभरणा करून विविध सवलतींचा लाभ घेतला. तसेच, नागरिकांनी ३० जूनपूर्वी कर भरून विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंह यांनी केले आहे.

महापालिकेने सिद्धी प्रकल्पाअंतर्गत मिळकतधारकांना घरपोच बिलांचे वाटप सुरू केले आहे. याशिवाय, सर्वांना घर बसल्या सुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी सर्व सुविधा ऑनलाइन केल्या आहेत. ई-मेलची सुविधा उपलब्ध आहे.

सारथी हेल्पलाइनमध्ये करसंकलन विभागासाठी ‘२४ बाय ७’ सुविधा उपलब्ध आहे. शहरात औद्योगिक, निवासी, बिगर निवासी, मिश्र आणि मोकळ्या जमीन अशा पाच लाख ९८ हजार मिळकती शहरात आहेत. १२ हजार १७९ मिळकतधारकांनी १० कोटी ५९ लाख रुपयांचा रोखीने भरणा केला आहे. विविध ॲपच्या माध्यमातून एक हजार २३८ जणांनी एक कोटी पाच लाखांचा कर भरला आहे. तर धनादेशाद्वारे दोन हजार ३७७ जणांनी सहा कोटी ४८ लाखांचा भरणा केला आहे.

करभरणा केलेल्या मिळकती

प्रकार / संख्या

औद्योगिक / ३६०

निवासी / ८०,५२३

बिगर निवासी / ४,९७६

मिश्र / १,१४४

मोकळ्या जमीन / ४६६

इतर / ६

वाकडमध्ये अधिक भरणा

महापालिकेचे शहरात १७ करसंकलन कार्यालये आहेत. वाकड कार्यालयात १४ हजार ७६८, थेरगाव कार्यालयात नऊ हजार २२८, चिंचवडमध्ये आठ हजार ४७०, सांगवीमध्ये आठ हजार ३८७ नागरिकांनी कर भरला आहे. सर्वात कमी पिंपरीनगर कार्यालयात केवळ ७१४ व तळवडेत ७१८ जणांनीच करभरणा केला आहे.

‘करसंकलन विभागाकडून त्रिसूत्रीनुसार काम सुरू आहे. जूनपूर्वी वार्षिक उद्दिष्टाच्या पन्नास टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी या जूनपूर्वी करभरणा करून सवलतींचा लाभ घ्यावा.’

- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com