rainbow pmpl
rainbow pmplesakal

PMPL ने व्हावे अपडेट ! रेल्वे आणि विमान प्रवासाच्या धर्तीवर सुरू करावी ‘ऑनलाइन तिकीट विक्री’

पिंपरी, ता. १५ ः रेल्वे आणि विमान प्रवासाच्या धर्तीवर शहर बससेवेसाठी पीएमपीएलने ऑनलाइन तिकीट विक्री सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या राज्यात आणि देशात ऑनलाइन पद्धतीने पेमेंट जास्त प्रमाणात सुरू आहे. रेल्वे, विमान व इतर ठिकाणी ऑनलाइन पेमेंट अ‍ॅपद्वारे तिकीट बुक केली जात आहेत. पुणे महानगर परिवहन बससेवेचा लाभ शहरातील हजारो लोक घेत आहेत. पीएमपीएलने स्वतःचे अ‍ॅप विकसित केल्यास नागरिकांना तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. प्रवासामध्ये तिकीट विक्री व सुट्या पैशांची समस्या राहणार नाही. कंडक्टरचा वेळ वाचून सुरक्षित, विवाद विरहित सेवा देता येईल. ऑनलाइन पेमेंट सुविधेमुळे कॅश, नाणी हिशोब व बँकेत भरण्याचा वेळखाऊ प्रशासकीय खर्च वाचेल.

‘‘पीएमपीएलच्या बससेवेला चांगला प्रतिसाद आहे. पण ऑनलाइन तिकीट विक्री सुविधा नसल्यामुळे खूप हाल होत आहेत. लवकरात लवकर सुविधा सुरू करण्याच्या मागणीचे पत्र पीएमपीएल महाव्यवस्थापक यांच्याकडे दिले आहे.’’
- वैभव छाजेड, सामाजिक कार्यकर्ते, चिखली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com