सीबीएसई बोगस प्रमाणपत्रप्रकरणी गुन्हा दाखल

सीबीएसई बोगस प्रमाणपत्रप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी, ता.१६ : शहरातील रावेत येथील ‘क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज’ या सीबीएसई शाळेला बोगस ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पिंपरी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने रावेत पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

सीबीएसई शाळांना राज्य शासनाचे बोगस ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) विकणारी टोळी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. या प्रकरणी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून तपासणी सुरू केली होती. दरम्यान; शहरात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) ‘क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज’ या शाळेला बनावट ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची माहिती संस्थाचालकांनी शिक्षण विभागाकडे दिली होती.
या प्रकरणी शिक्षण विभागाकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याविषयी प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, तसेच ‘यूडायस’ प्रणालीत माहिती न जुळणाऱ्या राज्यातील ६६६ सीबीएसई शाळांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. या प्रमाणपत्रांसाठी लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचेही पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

‘‘सीबीएसई बनावट प्रमाणपत्र प्रकरणी संबंधित शाळेच्या मान्यतेसंदर्भातील कागदपत्रे तपासण्यात आली होती. या प्रकरणी आता अज्ञात व्यक्‍तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’’
- रजिया खान, सहाय्यक प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com