‘कॉर्पोरेट जगतात
करिअरच्या संधी’

‘कॉर्पोरेट जगतात करिअरच्या संधी’

पिंपरी, ता. १८ ः ‘‘कॉर्पोरेट जगतात व्यवसाय विश्लेषक म्हणून करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात  उपलब्ध होत असल्याचे मत विदा विश्लेषक दिप्ती सिन्हा यांनी व्यक्त केले. 
यशस्वी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉर्पोरेट जगतातील व्यवसाय विश्लेषणाच्या संधी’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत  होत्या. या वेळी बोलताना त्यांनी व्यवसाय विश्लेषण आणि डेटा सायन्सच्या मूलभूत बाबींविषयी मार्गदर्शन करीत व्यवसाय विश्लेषणाच्या क्षेत्रात डॅशबोर्ड आणि अहवाल निर्मितीमधील महत्त्व स्पष्ट केले. व्यवसाय विश्लेषणाची कार्यशैली, जबाबदारी, विश्लेषणासाठी आवश्यक असलेली योग्य प्राथमिक माहिती आदी पैलूंबद्दलही सिन्हा यांनी विविध उदाहरणांसह विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी प्रश्नोत्तर सत्र झाले. प्रास्ताविक संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. प्रा. महेश महांकाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पुष्पराज वाघ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com