चिखली घरकुलमध्ये
पायाभूत सुविधा पुरवा
महापालिका आयुक्तांना आमदार लांडगे यांच्या सूचना

चिखली घरकुलमध्ये पायाभूत सुविधा पुरवा महापालिका आयुक्तांना आमदार लांडगे यांच्या सूचना

पिंपरी, ता. २३ : चिखली घरकुल प्रकल्पातील विविध प्रलंबित विकासकामे व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिका प्रशासनाने प्रस्तावित कामे मार्गी लावावीत, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यामुळे घरकुलमधील सोयी-सुविधा सक्षमीकरणाला बूस्टर मिळाला आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे, की घरकुल प्रकल्पातील एकूण १५८ इमारतींपैकी १५३ इमारतींचे पात्र लाभार्थ्यांना वाटप केले आहे. त्यामुळे येथे विविध प्रकल्प आणि विकासकामे मार्गी तत्काळ मार्गी लावणे अपेक्षीत आहे. चिखली घरकुल प्रकल्पात प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी जागा आरक्षित आहे. घरकुल प्रकल्पातून एकूण ६ हजार ४२६ सदनिका आहेत. या परिसरात सुमारे ३० हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळेचे आरक्षण विकसित करणे अत्यावश्यक आहे. या भागात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या मोकळ्या जागेतील १५ ते २० गुंठे जागा पोलिस ठाणे उभारण्यासाठी देण्यात यावी.

पदपथ, रस्ते विकासाला प्राधान्य...
यासह घरकुलमधील पदपथ व रस्ते दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. येथे नव्याने पदपथ विकसित करणे अत्यावश्यक आहे. तसेच विविध कामांसाठी केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती व नव्याने विकसित करणे अत्यंत निकडीचे आहे, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com