रुंदीकरणाची खडी
ठरतेय अपघातास निमंत्रण

रुंदीकरणाची खडी ठरतेय अपघातास निमंत्रण

सोमाटणे, ता. २४ ः येथे रस्ता रुंदीकरणासाठी साइड पट्टीवर टाकलेली खडी अपघाताला निमंत्रण ठरत असून खडीवरून दररोज दुचाकी घसरण्याचे प्रकार सुरू आहेत.
सोमाटणे-परंदवडी या एक किलोमीटर रस्ता रुंदीकरणाचे काम सहा महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले होते. हे काम कासव गतीने सुरू असल्याने अद्याप काम अर्धवटच आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदकाम करून त्यात मोठ्या आकाराची खडी टाकण्यात आली आहे. या खडीवर डांबरीकरण न केल्याने सध्या या खडीवरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. दुचाकीस्वार तर खडीवरून जाताना घसरण्याचे दररोज अनेक प्रकार घडतात. यातून दुचाकीस्वार जखमी होत असून अनेकांना किरकोळ मार लागल्याच्या घटना घडत आहेत. ही खडी अपघाताला निमंत्रण ठरत आहे.
याबाबत हनुमंतराव मुऱ्हे म्हणाले की, ‘‘हा रस्ता जास्त रहदारीचा असल्याने नेहमी रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. खडीवरून दुचाकी चालवताना अपघात घडत असल्याने संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे खडी, डांबरीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

PNE23T44800

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com