Property Tax
Property Taxesakal

Property Tax : पिंपरीतील तीन लाख नागरिकांनी घेतला मिळकतकर सवलत योजनेचा लाभ

पिंपरी शहरात सहा लाख दोन हजार २०३ मिळकतधारक आहेत.

पिंपरी - शहरात सहा लाख दोन हजार २०३ मिळकतधारक आहेत. त्यापैकी तीन लाख तीन हजार ३५० मिळकतधारकांनी गेल्या तीन महिन्यांत कर भरून ३० जूनपर्यंतच्या सवलत योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे तब्बल ४४७ कोटी तीन लाख ६५ हजार रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला.

मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात विविध उपक्रम राबवले. त्यात जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीस, नळजोड बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे आदींचा समावेश होता. शिवाय, यावर्षी महिला बचत गटांच्या माध्यमातून मिळकतकर बिलांचे घरपोच वाटप केले.

रिक्षांद्वारे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती केली. महत्त्वाच्या चौकांत होर्डिंग्ज लावले. रिल्स स्पर्धा घेतली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ताकराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा एसएमएसद्वारे कळविले. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यातच कराचा भरणा वाढला आहे.

३० जून ‘विक्रमी दिवस’

नेहमी वर्षाअखेर ३१ मार्च रोजी सर्वाधिक कराचा भरणा होत असतो. यंदा ३० जूनला सर्वच करसंकलन विभागीय कार्यालयांत मिळकतधारकांची गर्दी होती. ३० जूनला यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले गेले. या एकाच दिवसात तब्बल १४ हजार ६२० मिळकतधारकांनी ३० कोटी ८५ लाख रुपयांचा भरणा केला. त्यात २१ कोटी रुपये ऑनलाइन भरणा आहे.

दोन लाख ६८ हजार सहा निवासी मिळकतींचा कर आहे. २३ हजार ९१६ बिगर निवासी, सात हजार १३० मिश्र, दोन हजार २४६ औद्योगिक आणि दोन हजार १८ मोकळ्या जागांचा कर त्यांच्या मालकांनी भरला आहे.

सर्वाधिक करभरणा

कर संकलनासाठी शहरात १७ विभागीय कार्यालये आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक ३९ हजार ६००, सांगवीमध्ये ३४ हजार ६९४, चिंचवडमध्ये २९ हजार ३०३, थेरगावमध्ये २८ हजार ३६८ मिळकतधारकांनी करभरणा केला आहे. तर सर्वात कमी तळवडे कार्यालयांतर्गत चार हजार १३१ जणांनी कर भरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com