महावितरणचे अभियंता व सहकाऱ्यांच्या 
कौतुकास्पद कामगिरीसाठी गौरव

महावितरणचे अभियंता व सहकाऱ्यांच्या कौतुकास्पद कामगिरीसाठी गौरव

पिंपरी, ता. ३ : महावितरणचे सहायक अभियंता संतोष झोडगे व सहकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याहस्ते (ता.३) पालिकेच्या सभागृहात गौरव करण्यात आला.

निगडीमधील कै. मधुकरराव पवळे पुलाजवळ मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा भारत पेट्रोलियमचा एलपीजी गॅस टँकरला (२५ जून) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास अपघात झाला होता. टँकरमध्ये १८ टन गॅस असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलिस विभागाकडून महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार महावितरणकडून निगडी गावठाण, सेक्टर २४ व २६ तसेच साईनाथनगर परिसरातील पहाटे पाच वाजता चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच, सहायक अभियंता संतोष झोडगे तसेच प्रशांत माळोदे, जितेंद्र सारंगधर, गोपाळ गिरी, किरण नलगे यांनी दिवसभर त्याच ठिकाणी उपस्थित राहून कर्तव्य बजावले होते. सुदैवाने सर्व यंत्रणेच्या योग्य समन्वयामुळे अपघातग्रस्त टँकरपासून मोठा धोका टळला. महावितरणच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याहस्ते सहायक अभियंता संतोष झोडगे यांचा गौरव करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com