protest
protest sakal

Pimpri Chinchwad: मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा

या वेळी मोर्चाच्या वतीने तहसीलदारांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार

Pimpri - मणिपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील पुरोगामी संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने गुरुवारी महिला मोर्चा काढण्यात येणार आहे. निगडी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा येथून गुरुवारी दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात होईल.

protest
Pune Bus Stop: बिबवेवाडी बस थांबा तीन वर्षापासुन प्रतिक्षेतच

निगडीतील तहसीलदार कार्यालय येथे मोर्चाची सांगता होईल. या वेळी मोर्चाच्या वतीने तहसीलदारांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे
शहरातील विविध महिला संघटना व कार्यकर्त्यांची बैठक शाहूनगर येथील ‘धम्मचक्र बुद्ध विहार’ येथे नुकतीच झाली.

protest
अखेर PI बाजीराव पवारसह गर्जेवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

या बैठकीत ‘महिला सन्मान संघर्ष समिती- पिंपरी चिंचवड’ या नावाने संघटना स्थापन करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, प्रदीप पवार, नरेंद्र बनसोडे, देवेंद्र तायडे, धनाजी येळकर पाटील, राजन नायर आदी या बैठकीमध्ये उपस्थित होते.

protest
Anna Mani: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञाचा वाढदिवस गुगलने डूडल बनवून केला साजरा

या मोर्चाच्या संयोजक म्हणून कॉम्रेड लता भिसे- सोनावणे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर, माजी नगरसेविका लता ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्त्या शारदा मुंडे यांची निवड करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com