‘चांद्रयान-३’ विजय, राखी उपक्रम अन् मेहंदी स्पर्धा

‘चांद्रयान-३’ विजय, राखी उपक्रम अन् मेहंदी स्पर्धा

विद्येच्या प्रांगणात ः शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम

पिंपरी, ता. २५ ः शहरातील शाळामध्‍ये विविध सण साजरे करण्यात आले. ‘चांद्रयान-३’ यशस्वी मोहिमेसाठी विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

‘चांद्रयान-३’ यशस्वी मोहीम आनंदोत्सव
कॅम्प एज्युकेशन सोसायटी प्रेरणा पूर्व प्राथमिक शाळेमध्ये ‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सरिता विधाटे व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘चांद्रयान-३’ बाबत माहिती सांगितली.

स्मार्ट सिटी अंतर्गत देशभक्तिपर समूहगीत गायन
पिंपरी- चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत देशभक्तिपर समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये प्रेरणा प्राथमिक विद्यालयाला पहिली ते चौथीच्या गटाचा दुसरा क्रमांक मिळाला. मुख्याध्यापिका सुनीता जाधव, शिक्षक लीना मोहिते व श्‍यामराव खैरनार यांनी मार्गदर्शन केले. आदित्य जाधव याने तबल्यावर साथसंगत केली. महापालिकेचे सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संगीत संयोजन किरण बेंद्रे यांनी केले.

शिशुविहार विद्यालयात राखी स्टॉल उपक्रम
आकुर्डीमधील शिशुविहार प्राथमिक विद्यालयात तिसरीच्या विद्यार्थ्यांनी स्व निर्मित राखी विक्रीसाठी स्टॉल लावला होता. मुख्याध्यापिका योगिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक प्रकाश कदम, सुलभा दरेकर यांनी दोन दिवस आधी विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करून घेतल्या. व विक्रीसाठी विद्यार्थ्यांना मदत करून स्टॉल उभा करून दिला. उद्‍घाटन प्राचार्य बी. डी. मालुसरे यांच्या हस्ते झाले. हा स्टॉल मंगळवारपर्यंत (ता.२९) सुरू राहणार आहे. तरी, जास्तीत जास्त ग्राहकांनी भेट द्यावी, असे आवाहन मुख्याध्यापिका काळे यांनी केले आहे.

सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेमध्ये रक्षाबंधन
सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतीगृह व सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी एकत्रित रक्षाबंधनाचा कार्यक्रम संस्थेच्या बलदोटा सभागृहात घेतला. बहिणीने-भावांचे औक्षण करून राखी बांधली. भावाने बहिणीने रक्षाबंधनाची भेटवस्तू दिली. श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशचंद धारिवाल, दिना धारिवाल, शांतिलाल लुंकड, ॲड. राजेंद्र मुथा, राजेश संकला, प्रा. अनिलकुमार कांकरिया, राजेंद्रकुमार मुथा, वसतीगृहाचे गृहपती महावीर जैन, संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सतीश भारती, खिवराज मुथा, राहुलकुमार मुनोत, सुभाषलाल मुनोत, सुशीला मुथा, राजेंद्र सुराणा, नवीनचंद लुंकड, सुमितलाल ओस्तवाल, प्रकाशचंद बंब, खुशालचंद लुणावत, रमणलाल शिंगवी, हरिदास लुंकड, आनंदराम पगारिया, दीपक बाफना उपस्थित होते. स्वाती नेवाळे यांनी सूत्रसंचालन केले.

नागपंचमी सण व मेहंदी स्पर्धा
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये नागपंचमीनिमित्त मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. श्री फत्तेचंद विद्यालयाचा माजी विद्यार्थी सर्पमित्र शुभम पांडे यांचे व्याख्यान झाले. यावेळी विद्यार्थ्यांना सर्प प्रजाती, वैशिष्ट्य व संरक्षण याबद्दल माहिती सांगितली. पर्यवेक्षक संजीव वाखारे, पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी उपस्थित होत्या. मेहंदी स्पर्धेत विद्यालयाच्या २३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्राचार्य सुनीता नवले यांनी मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी प्रास्ताविक केले. मिनाक्षी ताम्हणे, रोहिणी राऊत यांनी आयोजन केले. निर्मला चव्हाण व छाजेड ज्योती यांनी परीक्षण केले. मेघा नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक राजेंद्र पितळीया यांनी आभार मानले.

संचेती विद्यालयात फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेची भेट
थेरगाव- नेहरू विज्ञान केंद्र राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, मुंबई यांच्या वतीने फिरत्या विज्ञान प्रयोगशाळा बसने संचेती विद्यालयास भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, विज्ञानाचे क्लिष्ट प्रयोग सोपे करून विद्यार्थ्यांना सांगता यावे, या दृष्टीने ही प्रयोगशाळा लाभदायी ठरली. या प्रयोगशाळेत एकूण वीस प्रयोग
होते. वीस स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी प्रयोगांची माहिती दिली.



कन्या शाळेत संतांची वेशभूषा आणि रचना
कन्या विद्यालयात सातवीच्या विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा केली होती. त्यांना इतिहास विषयांतर्गत शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठात वारकरी संप्रदायाचे कार्य समजण्यासाठी संतांची वेशभूषा व संतांनी रचलेली कोणतीही एक रचना सादर करण्यास सांगितली होती. त्यानुसार विद्यार्थिनींनी वेशभूषा करून सुंदर असे सादरीकरण केले. यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका ऊर्मिला पाटील उपस्थित होत्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका सौ. फिसरेकर यांनी आयोजन केले.

शिक्षण प्रसारक मंडळी मध्ये वंदन फेरी
‘माझी माती माझा देश’ या शासनाने ठरवलेल्या उपक्रमांतर्गत वंदन फेरी काढण्यात आली. मुख्याध्यापिका उमा घोळे (पूर्व प्राथमिक विभाग), सविता बिराजदार(माध्यमिक विभाग), मुख्याध्यापक रवींद्र मुंगसे (प्राथमिक विभाग), पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत भारत मातेची प्रतिमा व माती पूजन करण्यात आले. यानिमित्त शाळेतील विद्यार्थी क्रांतिकारकांच्या वेशभूषेत आले होते. शाला समिती अध्यक्ष दामोदरजी भंडारी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com