दिव्यांग, वैद्यकीय सवलत  
व्यक्तींच्या पासेसला मुदतवाढ

दिव्यांग, वैद्यकीय सवलत व्यक्तींच्या पासेसला मुदतवाढ

पिंपरी, ता. २९ : महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना व वैद्यकीय सवलत (दुर्धर आजार) असलेल्या व्यक्तींना २०२२-२३ या वर्षाकरिता पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत मोफत बस प्रवास पास देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने संबंधित पास धारकांना २८ एप्रिल २०२३ अखेरपर्यंत पीएमपीएमएल बसेस मधून २०२२-२३ या वर्षाचा जुना पास दाखवून मोफत बस प्रवास करता येईल.
जुन्या पासची मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपत आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड मनपाकडून २०२३-२०२४ पासून सदरची योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचे नियोजन आहे. याबाबतची कार्यवाही होईपर्यंत २८ एप्रिल २०२३ पर्यंत पिंपरी-चिंचवड मनपाकडील २०२२-२०२३ मधील संबंधित पास धारकांना मुदतवाढ देण्यात यावी, असे समाज विकास विभागाने कळविल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com