सोमाटणे टोलनाक्यावर 
स्थानिकांकडून टोलवसुली

सोमाटणे टोलनाक्यावर स्थानिकांकडून टोलवसुली

सोमाटणे, ता. २९ ः पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाक्यावर स्थानिकांना टोलमाफी जाहीर केल्यानंतरही फास्टॅग वापरणाऱ्या स्थानिकांकडून टोलची वसुली सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली.
हा टोलनाका नियमबाह्य असून, तो तत्काळ बंद करावा, या मागणीसाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली ११ ते १४ मार्च दरम्यान उपोषण व रास्ता रोको आंदोलन झाले होते. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सोमाटणे टोलनाक्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन, त्यावर कायमचा तोडगा काढू व तोडगा निघेपर्यंत स्थानिकांना टोलमाफी देऊ, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार टोल प्रशासनाने स्थानिकांच्या वाहनास सूट दिली होती. परंतु याचा फायदा केवळ फास्टॅग नसलेल्या वाहनास झाला.

चौकट
--------
तक्रारीनंतर पैसे परत मिळणार
याबाबत टोलवसुली करणाऱ्या आयआरबी कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले, की याबाबतचा पुढील निर्णय होईपर्यंत स्थानिकांची टोलमाफी केलेली आहे. परंतु फास्टॅग वापरणाऱ्या स्थानिकांच्या खात्यातून
टोलचे पैसे वजा होतात. त्यांना नंतर हे पैसे परत मिळतील. अशा वाहनचालकांनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांची रजिस्टरमध्ये नोंद ठेवली जात आहे.

‘‘ज्या वाहनचालकांनी वाहनास फास्टॅग लावला आहे, अशी वाहने टोलनाक्यावरून गेल्यास, त्यांच्या बॅंक खात्यातून टोलचे पैसे वजा होत आहेत.’’
- दत्तात्रेय रेडकर, स्थानिक वाहनचालक

PNE23T33516

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com