दारुभट्टीवरील कारवाईमुळे 
पवनमावळात उत्पादकात भीती

दारुभट्टीवरील कारवाईमुळे पवनमावळात उत्पादकात भीती

सोमाटणे, ता. २६ ः पवनमावळातील भडवली येथील गावठी दारूभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून दारूभट्टी उध्वस्त केली असून आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.
पवनमावळातील पवना नदीकाठचा परिसर हा दाट झाडीचा, निर्मनुष्य व दारुभट्टीसाठी सुरक्षित असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा परिसर गावठी दारू तयार करणाऱ्यांचा अड्डा बनला होता. दरम्यानच्या काळात शिरगाव पोलिस ठाण्याची नव्याने निर्मिती झाल्यानंतर अवैध धंद्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवत अनेक गावठी दारूभट्ट्या उध्वस्त करण्याचे सत्र सुरू केले होते. सर्वाधिक कारवाई ही पवना नदी परिसरातील शिरगाव ते कडधे व द्रुतगती मार्ग परिसरातील शिरगाव ते ओझर्डे बऊर दरम्यान करण्यात आली होती. पाच दिवसापूर्वी पोलिसांनी शिरगाव हद्दीतील द्रुतगती मार्गालगत छापा टाकून सहा लाख ८५ हजार रुपयांची गावठी दारू व तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करून दारूभट्टी उध्वस्त केली होती. आठवड्यातील ही दुसरी घटना असताना मंगळवारी रात्री आठ वाजता पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पोलिसांनी धडक कारवाई करत पवनमावळातील भडवली येथील दारूभट्टी उध्वस्त केली. या कारवाईत एक हजार २०० रुपये किमतीची वीस लिटर दारू नष्ट केली. या कारवाईमुळे दारू तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com