भूमकर चौकात तत्काळ उपाययोजना करा

भूमकर चौकात तत्काळ उपाययोजना करा

भूमकर चौकात तत्काळ उपाययोजना करा
- खासदार श्रीरंग बारणे यांची पोलीस आयुक्तांना सूचना
- एकेरी वाहतूकमुळे स्थानिकांना मनस्ताप
पिंपरी, ता. २७ : आयटीपार्क हिंजवडीकडे जाणाऱ्या भूमकर चौक, विनोदेवस्ती व लक्ष्मी चौकातील मार्गावर एकेरी वाहतूक केल्याने कोंडी सुटण्याऐवजी त्यात भर पडली आहे. एकेरी वाहतूक पद्धतीमुळे नागरिक, व्यापारी यांना दोन किलोमीटरचा वळसा मारावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तत्काळ प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस प्रशासनाला केल्या आहेत.
याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाऱ्या भूमकर चौक विनोदेवस्ती आणि लक्ष्मी चौकातील मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. या एकेरी वाहतूक पद्धतीमुळे त्या भागातील नागरिक, व्यापारी यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. किरकोळ कामासाठी सुद्धा दोन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. हे त्रासदायक ठरत आहे. त्याच भागातून जाताना वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.

अन्यथा नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
या संदर्भात या भागतील नागरिक व व्यापारी यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाची कैफियत माझ्याकडे मांडली आहे. यातून लवकरात लवकर मार्ग काढावा. अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. त्यामुळे आपण गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून त्वरित उपाययोजना कराव्यात, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com