द्रुतगतीवर आता 
सीसीटीव्हीची नजर

द्रुतगतीवर आता सीसीटीव्हीची नजर

सोमाटणे, ता. २८ ः वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी व अपघात रोखण्यासाठी द्रुतगती मार्गावर वाहतूक व्यवस्थापन प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे बसणार आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघात अति वेग, लेन कटिंग, रस्त्यात वाहने उभी करणे, चालकास झोप लागणे, वाहतूक नियम मोडणे आदी कारणामुळे होत आहेत. अपघात रोखण्यासाठी यापूर्वी अनेक उपाय करण्यात आले. यात स्पीड गणचा वापर, अपघातग्रस्त ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, महामार्ग पोलिस व परिवहन विभागाकडून प्रबोधन करणे, दंडात्मक कारवाई करणे, सूचना फलक लावणे, वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, गोल्डन अवर्स आदी उपाय केले होते तरीही अपघात कमी झाले नाही, उलट ते वाढत गेले. यावर कायमचा उपाय म्हणून दर चार किलोमीटर अंतरावर एक सीसीटीव्ही कॅमेरा, असे एकूण ९४ किलोमीटर अंतरात ३७० कॅमेरे बसवले जाणार असून सध्या या कामाला सुरुवात झाली आहे. हे कॅमेरे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकावर नजर ठेवणार आहे, अशी माहिती रस्तेविकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.

PNE23T45491

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com