शासन आपल्या दारी अंतर्गत
लोकजत्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

शासन आपल्या दारी अंतर्गत लोकजत्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

सोमाटणे, ता. २८ ः येथे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत आयोजित केलेल्या महसूल लोकजत्रेला परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
पुणे जिल्हाधिकारी व मावळचे तहसीलदार यांच्या आदेशाने मंडल अधिकारी तळेगाव दाभाडे यांच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत सोमाटणे येथे लोकजत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यास परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी हजेरी लावून या उपक्रमाची पाहणी करून नागरिकांना उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. मंडल अधिकारी बी. के. मेकाले, तलाठी वैभव भुतेकर, कविता मोहमारे, भारत रूपनवर, सुजाता रच्चेवार, सुनीता पेरके यांनी नागरिकांना मागणीप्रमाणे तत्काळ उत्पन्नाचे दाखले, शिधापत्रिका दुरुस्ती व मतदार यादीतील नाव दुरुस्ती, नाव कमी करणे व नवीन घेणे, आधार कार्ड दुरुस्ती, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अर्ज स्वीकृती, विविध दाखल्याचे अहवाल, फेरफार दुरुस्ती, तलाठी उत्पन्नाचे दाखले, सातबारा, आठ अ उतारे देणे, आदी कामे करण्यात आले. सूत्रसंचालन सद्गुरू मुऱ्हे यांनी तर आभार माजी सरपंच राजेश मुऱ्हे यांनी मानले.

PNE23T45508

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com