टॅंकरच्या भडक्यातील
मृतांची संख्या पाचवर

टॅंकरच्या भडक्यातील मृतांची संख्या पाचवर

लोणावळा, ता. १४ ः रसायन वाहून नेणाऱ्या टॅंकरला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या पाच झाली आहे. उपचारादरम्यान मोटारचालकाचा बुधवारी मृत्यू झाला. अद्याप दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील कुणे पुलावर टॅंकरला मंगळवारी आग लागली. थोड्याचवेळात आगीचा भडका उडाला. त्यामध्ये चौघांचा भाजून मृत्यू झाला होता. गंभीर जखमी झालेल्या मोटारचालकाला पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, आज दुपारी त्याचा मृत्यू झाला.
गणेश एकनाथ पळसकर (वय-३२, रा. घाटकोपर, मुंबई) असे मृत मोटारचालकाचे नाव आहे तर जनार्दन बापूराव जाधव (रा. सातारा) असे होरपळून मृत्यू झालेल्या टॅंकरचालकाचे नाव आहे. कुशल कैलास वरे (वय- ८), सविता कैलास वरे (वय- ३३, रा. राजमाची), रितेश महादू कोशिरे (वय- १७, रा. भांवर्डे) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. नितीन सुखदेव सप्रे (रा. सातारा), चंद्रकांत आप्पासाहेब गुरव (रा. पुणे) अशी गंभीर झालेल्या टॅंकरमधील व्यक्तींची नावे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com